राहुरी फॅक्टरीच्या आदित्य पाळंदेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राहुरी,दि.१० सप्टेंबर,(प्रतिनिधी) – राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा एन. सी. सी. छात्र आदित्य जेम्स पाळंदे याची पॉईंट २२ रायफल शूटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात यांनी शाल, श्रीफळ, व वृक्ष भेट देऊन अभिनंदन केले.        

राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमचे कर्मचारी असलेले जेम्स पाळंदे आणि कोविड काळात विद्यापीठ येथील शासकीय कोविड मध्ये पूर्ण वेळ परिचारिका म्हणून सेवा देणाऱ्या निर्मला पाळंदे यांचे चिरंजीव आदित्य वय १४ याची नुकतीच २५ मीटर पॉईंट २२ रायफल शूटिंग साठी एन. सी. सी. च्या औरंगाबाद बटालियन मध्ये सर्वात उत्कृस्ट शूटर म्हणून निवड झाली होती. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आदित्यने हे यश संपादन केले आहे.        

औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई ए, मुंबई बी आणि धुळे आदी सात  विभागातील सर्व बटालियन मधील १४० कॅडेट मधून २५ कॅडेटची भोपाळ येथे  लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या २५ कॅडेट मध्ये आदित्यचा सातवा क्रमांक राहिला. आई वडील दोघेही दिवसभर कामावर बाहेर असताना राहुरी फॅक्टरी येथील कामगार वसाहतीमध्ये राहून कोणत्याही प्रकारची खेळाची सुविधा उपलब्ध नसताना आदित्यला मिळालेले यश नक्कीच वाखाणण्याजोगे असून अभिनंदनास पात्र आहे. राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातील एन सी सी ऑफिसर संदीप गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here