कोल्हार खुर्द सोसायटीत १० वर्षानंतर सत्तांतर, विखे गटाला धूळ चारत महाविकास आघाडीला बहुमत

राहुरी,दि.२७ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – कोल्हार खुर्द येथील अटीतटीच्या झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेत अखेर दहा वर्षाने सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल शिरसाठ व कॉंग्रेसचे सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पँनेलने १३ पैकी ७ जागा मिळवत निर्विवाद सत्ता मिळविली आहे. सत्ताधारी विखे गटाला ६ जागांवर समाधान मानावे लागले. तालुक्याचा आरंभ होत असलेल्या नि प्रवरा पट्ट्यातील विखेंचे वर्चस्व असलेल्या या गावातून मंत्री तनपुरेंनी बाजी मारली असल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उत्साहात आहेत.

राहुरी तालुक्याच्या उत्तरेच्या सीमेवर असणाऱ्या कोल्हार खुर्द विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मतदान शनिवारी शांततेत पार पडले. मतदानानंतर तासाभराने मतमोजणी होत सत्ताधारी विखे गटावर वर्चस्व करीत विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना पुरस्क्रुत गटाने १३ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यात सर्वसाधारण मतदार संघातून दिलिप कारभारी घोगरे, भास्कर विश्वनाथ घोगरे, प्रभाकर बाबुराव जाधव, अनिल माधव शिरसाठ, मागास प्रवर्ग मतदार संघातून प्रकाश सुखदेव चिखले, अनु जाती, जमाती मतदार संघातून संजय फ्रान्सिस भोसले,  महिला राखीव मतदार संघातून
लताबाई दिलिप शिरसाठ तर सत्ताधारी गटाचे
रंगनाथ मुरलीधर घोगरे, सुरेश रामचंद्र जाधव, महेश रंगनाथ पाटील, बाळासाहेब महादु लोंढे, महिला राखीव ज्योती दिपक शिरसाठ,
इतर मागासवर्गीय मतदार संघातून दिगंबर कारभारी शिरसाठ विजयी झाले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here