अहमदनगर,दि.३ एप्रिल,(प्रतिनिधी) – अहमदनगर शहरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी
रेडिओ सिटी ९१.१, व्यंकटेश मल्टिस्टेट आणि वसंतलाल रसिकलाल बोरा ह्यांच्यातर्फे
भव्य अश्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५ वाजल्यापासूनच प्रोफेसर कॅालनी चौकात ह्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल- ताशा, संबळ, हलगी ह्यांच्या वादनाने वातावरण भारावून गेले होते.
शिल्पकार-चित्रकार प्रमोद कांबळे ह्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची
भव्य-दिव्य अशी प्रतिमा त्याचबरोबर घोड्यावर बसलेले बाल शिवाजी आणि झाशीची राणी हा देखावा फारच मनोहारी होता. ब-याच स्त्रिया पारंपारिक नववारी साडी आणि पुरूष धोतर – सदरा नेसून आलेले दिसले. शोभायात्रेमध्ये नगरचे अनेक ग्रुप्स सहभागी झाले होते. त्यापैकी संस्कार भारती, रोटरी क्लब, आम्ही मैत्रिणी , व्यंकटेश मल्टिस्टेट, स्वानंदी हास्य क्लब,
मॅार्निंग ग्रुप, लिनेस ग्रुप, श्रावणसखी ग्रुप, निसर्ग मित्र , टच फाऊंडेशन, तिरंगा फाऊंडेशन, युवान ग्रुप, सकल राजस्थानी युवा आणि महिला मंच, तिरंगा फाऊंडेशन, निरंजन सेवाभावी संस्था, घर घर लंगर सेवा असे असंख्य ग्रुप सहभागी झाले होते.

चैत्र शोभायात्रेची सुरुवात प्रमोद कांबळे ह्यांनी रेखाटलेल्या गुढीच्या चित्राने झाली. जिल्ह्याचे
पोलीस अधिक्षक मनोज पाटील हे स्वतः उद्घाटनाला हजर होते. त्यांनी महाराजांच्या
प्रतिमेचे पुजन करून ह्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कठीण काळानंतर पहिल्यांदाच असा उत्साह बघून ते भारावून गेले होते. त्याचप्रमाणे तोफखाना पोलिस स्टेशनच्या अधिकारी
ज्योती गडकरींही जातीनं संपूर्ण यात्रेभर उपस्थित होत्या. महापौर रोहिणी शेंडगे , नगरसेवक भैय्या गंधे, एल अँड टी चे
अरविंद पारगांवकर ही उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. प्रोफेसर चौकापासून सुरूवात करून गुलमोहोर रोड मार्गे पारिजात चौकातून
एकवीरा चौकात ह्याची सांगता झाली.
ह्या दरम्यान चौका चौकात आपली संस्क्रुती आणि परंपरा दर्शवणारे कार्यक्रमही झाले
ते खालीलप्रमाणे

१.संस्कार भारती – नृत्य विधा – गणेशवंदना – प्रोफेसर कॅालनी चौक
२.गोडाळकर भगिनी – तलवारबाजी, दांडपट्टा – कुष्ठधामकडून गुलमोहर रोडकडे वळणारा चौक
३.हरिदासजी आणि त्यांचा ग्रुप – संबळ आणि ताशा वादन – कलानगर चौक (सुरूवातीपासून ते रॅलीमध्येही आपल्याबरोबर असणार आहेत )
४.स्वानंदी हास्य क्लब – हास्य योग प्रात्यक्षिके – कलानगर चौक

५.श्रावणसखी ग्रुप – मंगळागौर खेळ – आनंद शाळा चौक
६.व्हिक्टर डान्स ॲकॅडमी – मराठी कपल डान्स – आनंद शाळा चौक
७.शिवसूर्य मर्दानी आखाडा – तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी – पारिजात चौक
८.व्हिक्टर डान्स ॲकॅडमी – मराठी गाणी ग्रुप डान्स – पारिजात चौक
९.श्री गुरूमाऊली संगीत विद्यालय – छोट्या मुलांचं पंढरीची वारी डान्स – एकवीरा चौक
१०. MMYTC – पारंपारिक वेषात मल्लखांब – एकवीरा चौक

११.Shubha’s fashion studio- मराठमोळा फॅशन शो
एकवीरा चौकातील समारोप प्रसंगी आमदार संग्रामभैय्या जगताप जातीने उपस्थित होते. त्यांच्याहस्ते नगरविकासाची
गुढीही उभारण्यात आली. त्याचबरोबर शिवसेनेचे संभाजी कदमही उपस्थित होते. ग्कार्यक्रमासाठी डिझाईन अडिक्टचे ज्ञानेश शिंदे, वासन टोयोटा, पुष्पक पब्लिसिटीचे नितीन जावळे, विराज मुनोत, प्रशांत जठार, संदिप कुसाळकर आणि युवानची टीम ह्याचं मोलाचे सहकार्य लाभलं. या कार्यक्रमासाठी व्यंकटेश मल्टिस्टेटचे अभिनाथ शिंदे आणि क्रुष्णा शिंदे तसंच वसंतलाल रसिकलाल बोरा ज्वेलर्सचे अतुल बोरा ह्यांचे अनमोल सहकार्य लाभले. या प्रसंगी रेडिओ सिटी अहमदनगरच्या प्रमुख चैत्राली जावळे, आरजे प्रसन्न, आरजे आशुतोष, आरजे आकांक्षा, सेल्स हेड धनेश खत्ती, गौरव चव्हाण, पवन आणि मंगेशही उपस्थित होते. ह्याप्रसंगी पोलीस प्रशासनाचंही खूप मोठे सहकार्य लाभलं.