अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोरोना योध्दा ‘सांस्कृतिक नायक पुरस्कार’ ना.उदय सामंत यांचे हस्ते प्रदान

अहमदनगर,दि.२० नोव्हेंबर,(प्रतिनिधी) – अहमदनगर शहराच्या नाट्य-सांस्कृतिक चळवळीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेचे योगदान मोठे असून शहरातील आणि जिल्ह्यातील या नाट्य चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांचेकडून होत आहे. याच बरोबर सामाजिक जाणिव जिवंत ठेवून कोरोना काळात कलाकारांनी कलाकारांसाठी धावून जात मोठी मदत केली तसेच समाजातील प्रत्येक घटकांच्या मदतीसाठी उभे राहिलेले कोरोना योद्धे हे खरे सांस्कृतिक नायक आहेत असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने आयोजित कोविड योद्धा संस्कृतिक नायक पुरस्कार समारंभात ते बोलत होते. आमदार संग्राम भैय्या जगताप, महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नाट्य परिषद अध्यक्ष अमोल खोले, मध्यवर्ती मुंबई चे सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, उपाध्यक्ष श्याम शिंदे, शशिकांत नजान यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, अहमदनगरची नाट्य,सांस्कृतिक परंपरेला मोठा इतिहास आहे. या क्षेत्राला हक्काचे नाट्य गृह व्हावे म्हणून नाट्यकर्मींनी अनेक आंदोलने केली त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ९ कोटींचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे. नाट्यगृह ७ ते ८ महिन्यात पुर्ण होईल, नाट्यगृह तयार झाल्यानंतर ते नाट्य परिषदेने चालवावे. या वास्तुचे महत्व कलाकारांना अधिक असेल. भविष्यात नाट्य,सांस्कृतिक क्षेत्राला मी सर्वोतोपरी सहकार्य करील शहराचा आमदार म्हणून मी माझे हे कर्तव्य समजतो.

महापौर सौ.रोहिनीताई शेंडगे म्हणाल्या की लवकरात लवकर नाट्यगृह बांधकाम पूर्ण करून ते नाट्यकर्मीं उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात सांस्कृतिक क्षेत्रासाठी विविध योजना तयार करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात गरजू कलावंतांना मदत करण्यात आली. समाजातील महत्वाचा घटक असणाऱ्या कलाविश्वाच्या मदतीला ठाम उभे असणारे सांस्कृतिक योध्ये सर्वश्री शशिकांत नजान, क्षितिज झावरे, तुषार चोरडिया, किरण खरात, सॅमसन अलसमराव यांना कोरोना योद्धा “सांस्कृतिक नायक” हा पुरस्कार नाट्य परिषदेचे विश्वस्त व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत यांच्या हस्ते आणि याप्रसंगी मा.आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप, महापौर सौ.रोहिनीताई संजय शेंडगे, विरोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

तसेच कोरोना काळात अनेक रंगकर्मींनी आपापल्या परिने योगदान दिले आहे. त्यात दिपक शर्मा, विलास बडवे संस्कार भारती, सुशांत घोडके यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नगर मधील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी केल्याबद्दल डॉ.श्याम शिंदे, स्वप्नील मुनोत, ॲड. अभिजित दळवी, पुष्कर तांबोळी यांचाही सन्मान करण्यात आला. माऊली सभागृहाचे एम.बी. सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात संचारबंदी असताना केवळ कलाकारांचे आर्थिक, कौटुंबिक, अडचणी दूर करण्यासाठी अहोरात्र श्रम करणाऱ्या या योध्यानी रक्ताची नाती दूर जात असताना स्वतः अनेकांच्या परिवाराचे रक्षक म्हणून कार्य केले. कोणी कलावंत उपाशी झोपू नये म्हणून किराणा किट, फूड पॅकेट वाटप करून मोठे कार्य केले, रूग्णांना रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यासाठीही या योध्यानी प्रयत्न केले. या योध्यांच्या कार्याला सन्मान द्यावा या हेतूने नाट्य परिषद अहमदनगर शाखेने कोरोना योध्या “सांस्कृतिक नायक” या पुरस्कारा साठी वरील कलाकाराची निवड केली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक सतीश लोटके यांनी केले, स्वागत अमोल खोले यांनी केले तर आभार डॉ.श्याम शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रसन्ना पाठक यांनी केले.
कार्यक्रमास सौ.उर्मिला लोटके, सुजाता पायमोडे, सौ.धनश्री खोले, अविनाश कराळे, अभिजित दरेकर, शिवाजी शिवचारण, प्रा.शुभांगी कुंभार, योगेश विलायते, रियाज पठाण, राहुल भिंगारदिवे, संजय आढाव, चंद्रकांत सैंदाणे, सतीश मिसाळ, अमीत खताळ, अनंत रिसे, सुनील राऊत, इरफान कुरेशी, स.मो.इनामदार, प्रसाद भणगे, किशोर पराते, राम शिंदे तसेच सर्व नाट्य संस्था प्रमुख,जेष्ठ नाट्यकर्मी उपस्थित होते.


Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here