राहुरी,दि.१० जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. दुःखद अंतकरणाने त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला असला तरी त्यांच्या असंख्य आठवणी मनामध्ये दाटुन येत आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शब्दगंधच्या वतीने ‘अनाथांची माय’ हा प्रातिनिधिक काव्य व लेखसंग्रह प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
‘शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य’ वतीने झालेल्या श्रद्धांजली सभेत सदर निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एक कविता किंवा त्यांच्या सोबतचे आपले अनुभव, लेख, स्वतःचा परिचय, पासपोर्ट फोटो
दि.२० जानेवारी २०२२ पर्यंत टाईप केलेले असेल तर वैयक्तिक व्हाट्सअप क्र.९९२१००९७५० वर किंवा लेखी असल्यास पोस्टाने शब्दगंध – फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महाला जवळ,तपोवन रोड,सावेडी, अहमदनगर – ४१४००३ मो.९३७१८१२९८९ येथे पाठवावे असे आवाहन प्रा.डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत, सुभाष सोनवणे, प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे, अजयकुमार पवार, शाहिर भारत गाडेकर, डॉ.तुकाराम गोंदकर, ज्ञानदेव पांडुळे, राजेंद्र फंड, स्वाती ठुबे, सुनीलकुमार धस, किशोर डोंगरे, रामकिसन माने, राजेंद्र पवार, बबनराव गिरी व शर्मिला गोसावी यांनी केले आहे.