बालरंगभूमी परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने ‘हसत खेळत बालनाट्य’ शिबिराचे आयोजन

अहमदनगर,दि.१७ एप्रिल,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्यातील बालकलाकार नाट्य अभिनय क्षेत्रात अधिक प्रगल्भ व्हावेत यासाठी महत्वाचे पाऊल म्हणजे बालरंगभूमी सशक्त करणे होय. या अंतर्गत
बालरंगभूमी परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने दिनांक १ मे ते १० मे २०२२ दरम्यान ‘हसत खेळत बालनाट्य’ शिबिराचे (Acting workshop) आयोजन करण्यात आले अशी माहिती अध्यक्षा सौ.उर्मिला लोटके यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की नाट्य, गायन, वेबसिरीज, चित्रपट क्षेत्रात अहमदनगरचे कलाकार तंत्रज्ञ अग्रेसर आहेत. बालरंगभूमी हा कलाकारांचा पाया आहे आणि तोच मजबूत व्हावा.

बालकलाकरांना शास्त्रोक्त माहिती आणि प्रशिक्षण मिळावे ज्यातून त्यांचा चौफेर विकास व्हावा हा आमचा हेतू आहे. हसत खेळत शिबिरात नाट्य, अभिनय, नृत्य, नवरस, रंगमंचीय खेळ याची ओळख अनुभवी नाट्य तज्ञांकडून मुलांना करून दिली जाणार आहे. या शिबिरात ७ ते १५ या वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. शिबीरा संदर्भात अधिक माहितीसाठी उर्मिला लोटके (9834459038), टीना इंगळे (9881154489), सुजाता पायमोडे (9850177042) या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here