बिग बॉस विजेता सिध्दार्थ शुक्लाचे निधन

अहमदनगर,दि.२ सप्टेंबर,(ऑनलाईन टीम) – बिग बॉस सीझन १३चा विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थने वयाच्या ४०व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्लाचे सध्या शव असून पोस्टमॉर्टम तिथेच केले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. रूग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं. रूग्णालयाने त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं स्पष्ट केलं आहे. 

माहितीनुसार, सिध्दार्थ शुक्ला रात्री औषध घेऊन झोपला होता. परंतु औषध कोणते घेतले होते, याबाबतची माहिती मिळालेली नाही आहे. सिध्दार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने हिंदी टेलिव्हिजन जगताला मोठा झटका लागला आहे. काही दिवसांपूर्वीच सिध्दार्थ शहनाज गिल सोबत ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसला होता. सिद्धार्थने २००८ साली टेलिव्हिजन शो ‘बाबुल का आंगन छूटे ना’पासून करिअरला सुरुवात केली होती. ज्यानंतर तो ‘जाने पहचाने से अजनबी’, ‘सीआईडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘लव यू जिंदगी’ सारखे टेलिव्हिजन शो आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here