बोठे यांचे कार्य कौतुकास्पद – सचिव जी.डी. खानदेशे

अहमदनगर,दि.१७ एप्रिल,(प्रतिनिधी) – विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून इंग्रजी विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लावून कोरोना काळातही उपक्रमशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरेश बोठे यांनी केले. शांत, मीतस्वभावी, उपक्रमशील असणार्‍या बोठे यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांनी काढले. श्रीराम विद्यालय राळेगण तालुका नगर येथील मुख्याध्यापक सुरेश बोठे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमात ते बोलत होते. संस्था, पालक यांच्या सहकार्यातून व शिक्षकांच्या मेहनतीतून राळेगण शाळेने एक आदर्श निर्माण केल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले.

याप्रसंगी वृद्धेश्‍वर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, राळेगणचे उपसरपंच सुधीर भापकर, वाळकीचे सरपंच शरद बोठे, बाजार समितीचे माजी सभापती विलास घिगे, दादासाहेब दरेकर, प्राचार्य विजय पोकळे, विद्यार्थिनी अस्मिता हराळ, बाळासाहेब पिंपळे, राजेंद्र कोतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, दत्ता पाटील नारळे, उद्योजक भाऊसाहेब बोठे, माजी प्राचार्य व्ही. एम. जाधव, पांडुरंग गोरे, आप्पासाहेब शिंदे, सुरेंद्र चव्हाण, सीताराम कोरडे, महेंद्र हिंगे, सुभाष डावखरे, रविंद्र पिंपळे, संतोष हराळ, अजिंक्य झेंडे, भाऊसाहेब साळवे, प्रयागा नेहूल, मोहन बोठे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय जाधव, संजय भापकर, हरिभाऊ दरेकर, सुजय झेंडे, निळकंठ मुळे, अरविंद कुमावत, रामदास साबळे, बाळासाहेब कुताळ आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here