बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात झाला बदल

पुणे,दि.२४ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राज्यातील इयत्ता १२ वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. १२ वीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होत आहे. अहमदनगरमधील संगमनेर येथे १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या घटनेमुळे ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे. १२ वीचा ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे, तर ७ मार्चला होणारा मराठीचा पेपर हा ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, यावर्षी मंडळाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ४ मार्चला इंग्रजीचा पेपर होईल. परंतू ५ मार्च आणि ७ मार्चला दुसऱ्या आणि तिसऱ्या भाषा विषयाची परीक्षा होती. बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुर्दैवाने एक घटना घडली त्यात पुणे विभागाकडे येणारा प्रश्नपत्रिकांचा ट्रक जळून खाक झाला. त्या ट्रकमध्ये ५ आणि ७ मार्चच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे राज्यभरातील ५ आणि ७ मार्चच्या परीक्षा पुढे नेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयानुसार ५ मार्चची परीक्षा ५ एप्रिलला होईल आणि ७ मार्चची परीक्षा ७ एप्रिलला होईल.


हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here