सहकार क्षेत्र १०० वर्षे टिकण्यासाठी काळानुरुप बदल करावे लागतील – गृहमंत्री अमित शाह

अहमदनगर,दि.१८ डिसेंबर,(प्रतिनिधी) – देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. सुरवातीला त्यांनी शिर्डी येथील साई संस्थान मंदिरात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर या खासदार सुजय विखे-पाटील यांच्या मतदारसंघात अमित शहा परिषदेसाठी उपस्थित राहिले. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितींना संबोधित करताना सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल याबाबतीत सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्राची भूमी ही सहकारासाठी काशीएवढीच पवित्र भूमी आहे. सध्या सहकार चळवळीला मदतीची गरज आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सहकार खाते काढले असल्याचे शहा म्हणाले. सहकारातील दोष आपल्याला काढावे लागतील. पण सहकार चळवळीवर ही वेळ का आली? असा प्रश्न अमित शहा यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

अमित शहा यांनी केंद्र सरकारतर्फे येत्या काळात सहकार चळवळ वाचवण्यासाठी कोणती रणनीती आखली जाईल, याबाबत भाष्य केले आहे. आम्ही यासाठी समित्या स्थापन करणार नाहीत तर सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या विद्वानांसोबत काम करू. वित्त, साखर कारखाने, वितरण, मार्केटिंग, दूध इत्यादी सर्वच क्षेत्रांसाठी ही रणनीती लागू असेल, असे अमित शहा म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रमध्ये जिल्हा बँक या आदर्श मॉडेल असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले. मला आनंद आहे हा प्रवरानगर कारखाना आजही सहकारी आहे. नाहीतर अनेक कारखाने खासगी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे खातं का काढलं हे सांगण्यासाठी मी येथे आलो असल्याचे शाह यावेळी म्हणाले. मोदी सरकारने साखर कारखान्याच्या अभ्यास केला आणि प्रश्न सोडवले असल्याचे शहा यावेळी म्हणाले आहेत.

देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या सहकार परिषदेतील भाषणातील प्रमुख मुद्दे –

– सहकार क्षेत्रात काळानुरूप अनुकूल बनवावे लागेल.
– प्रशासनाचे, पद्धतींचे आधुनिकीकरण करावे लागेल. सर्व व्यवहार काँप्युटराइज्ड करावे लागतील.
– कर्चमाऱ्यांमध्ये प्रोफेशनल कौशल्य असणाऱ्यांना योग्य सन्मान द्यावा लागेल.
– कुशल कर्मचाऱ्यांना जे बाहेर पॅकेज उपलब्ध आहे, ते पॅकेज द्यावे लागेल.
– त्यांना सोबत घेऊन स्पर्धेत उतरवाले लागेल.
– असे केले तरच सहकाराची चळवळ ५० ते १०० वर्षे पुढे नेता येईल.

– देशात लवकरच सहकार विद्यापीठाचा स्थापन केली जाणार.

– तसंच मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह कायदा देखील बदलणार.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here