झेंडीगेट हनुमान मंदिराचा लोकार्पण व हनुमान जन्मोत्सव सोहोळा उत्साहात  

अहमदनगर,दि.१७ एप्रिल,(प्रतिनिधी) – लोकसहभागातून मंदिराचा कायापालट झाला असून यासाठी ज्ञात-अज्ञात दानशूरांचे योगदान आणि प्रत्यक्ष मंदिरात अहोरात्र सेवा देत जे काम सेवेकर्यांनी दिले त्यातून मंदिर सुशोभित झाले आहे.
या मंदिराला इतिहास आहे. या मंदिरापासून श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघत होती. आज नगर शहर विस्तारले आहे. चहू बाजूने उपनगरे वसली आहेत. परंतु, या मंदिराच्या माध्यमातून जी परंपरा आपण जपली ती योग्य परंपरा पुढेही सुरु ठेऊन या स्थानाचे महत्व आपण सर्वजण जपूया. चांगले काम करणाऱ्यांना काही  लोक नाहक नाव ठेवतात तो अनुभव आपल्यालाही येत असेल त्याकडे लक्ष देऊ नये सत्याची कास धरत समानता आणि सेवा देणे हाच खरा धर्म आहे. तो मंदिरा सारख्या प्रार्थना स्थळातून समजतो. आपण जे बदल सुचवतो. त्यासाठी प्रयत्न करतो पण, प्रत्यक्षात परमेश्वरच ते आपल्याकडून करून घेत असतो असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

झेंडीगेट येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या सुशोभीकरणांनंतर हनुमानजयंतीच्या पूर्वसंध्येला मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया हेही उपास्थीत होते. यावेळी इंजि.निलेश बिहाणी यांचा साईनाथ कावट यांच्या हस्ते तर इंजि.मुरलीधर बिहाणी यांचा आ.जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सुंदर कांड हनुमान चालीसा व भीम स्तोत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले. आ.जगताप  व नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रारंभी सुरेश झंवर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याची माहिती दिली. राजेश सटाणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.साईनाथ कावट यांनी आभार मानले. देवस्थान प्रमुख रामदास कावट यांच्यासह सेवेकरी, दानशूर आणि भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.        

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here