तांदळी वडगाव येथील धर्मनाथ मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी नऊ लाख रुपये देणगी

मंदिराचे काम ऐतिहासिक वास्तु पध्दतीने होणार

अहमदनगर,दि.१६ जानेवारी,(शिवा म्हस्के) – नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी एकमेव नाथ पंथी देवस्थान आहे. या देवस्थानचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. हे देवस्थान विशेषत: नावारुपाला येत आहे. हा देव नवसाला पावणारा म्हणून नगर तालुक्यात प्रसिध्द आहे. देवस्थानचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुक्या जनावरांना या ठिकाणी देवस्थान प्रदिक्षणा घातल्या नंतर मुक्या जनावरांनचे अनेक आजार बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. या धर्मनाथाची यात्रा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दरवर्षी भरत असते. या यात्रेसाठी भक्तगण जिल्हा भरातुन या देवस्थान श्रध्दा पोटी या ठिकाणी येत असतात. कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांत यात्रा भरत नाही. 

याच गावातील सुमन काशिनाथ धाडगे यांनी आपले पती सैन्य दलातुन निवृतीनंतर मिळालेली रक्कम नऊ लाख रुपये धर्मनाथ जिर्णोद्धार कामा साठी देणगी स्वरुपात दिली आहे. या मंदिराचे काम पुरातन काळातील पध्दतीनुसार होणार आहे. त्या बांधकामांचे आयुष्य साधारण तीनशे ते चारशे वर्षे असेल असं मतं काम दिलेल्या कलाकारांनी या वेळी सांगितले. या ठिकाणी मोठं मोठे दगड अणु त्यावर धारीव कोरीव नक्षीदार काम चालू  आहे. सदर वास्तु वर्ष भरात उभी रहाणार आहे. या ठिकाणी अनेक भावीक भक्त मोठ्या प्रमाणावर देणगी देत आहे. या देवस्थानाला एकुण ३२ एकर एकर क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या उत्पन्नातुन देवस्थान दिवा बत्ती खर्च केला जातो. या ठिकाणी दर शनिवारी आमटी भाकर महाप्रसाद आयोजन केले जाते. या देवस्थानाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त गण येत असतो. या वेळी देणगीदार सुमन काशिनाथ धाडगे यांनी बोलताना सांगितले माझे पती कैलास वासी. मेजर काशिनाथ सावळेराम धाडगे यांच्या स्मरणार्थ व धर्मनाथवर आमची मोठी श्रद्धा असल्याने आम्ही देणगी देत आहोत.

यावेळी सरपंच बाळासाहेब ठोंबरे, माजी सरपंच रमेश ठोंबरे, उपसरपंच वैभव मुनफन, संतोष घिंगे, राजु उबाळे, सोमनाथ पोकळे, माजी सरपंच विलास घिंगे, भैरवनाथ देवस्थान अध्यक्ष कराळे, ओम भारतीय महाराज, भिवसेन नाना घिंगे, संपत घिंगे, संपत मुनफन, रावसाहेब घिंगे, चांगदेव मुनफन, साहेबराव अबुले, विठ्ठल ‌घिंगे, भिमराव घिंगे, संजय पवार, धर्मा साबळे, नवनाथ शिंदे, नामदेव आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here