लोकांना दम देऊ नका, तुमच्याकडे असणाऱ्या बेनामी मालमत्तेचा हिशोब द्या – किरीट सोमय्या

कर्जत दि २० डिसेंबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – ठाकरे सरकारमध्ये सर्व मंत्री लुटणारे आहे.  सर्व ४० चोर आहेत. ते सगळे आत जाणार. रोहित पवार, कर्जतच्या नागरिकांना दमबाजी करू नका. द्यायचा असेल तर लोकांना तुमच्याकडे असणारे बेनामी मालमत्तेचा हिशोब द्या. आपण ज्याचा भ्रष्टाचार बाहेर काढतो एकतर तो जेलमध्ये जातो. दुसरा तो बेलवर सुटतो किंवा दवाखान्यात ऍडमिट होतो असे प्रतिपादन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. ते कर्जत येथे भाजपा-आरपीआयच्या (आठवले गट) अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी माजीमंत्री राम शिंदे, खा.सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, अशोक खेडकर, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर आदी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की,  सगळे पवार किरीट सोमय्याचे उदोउदो करत आहे. पवार मी आज हिशोब मागण्यासाठी आलो आहे. किती रुपये गोळा केले ते सांगावेच लागणार. लुटालुटीचे राजकारण पवार कुटुंबियानाच जमते. हा सोमय्या कुणाला घाबरणारा नाही. तुम्ही त्याच्यापासून घाबरता म्हणूनच कालच्या सभेत आमचे नाव घेता. सिद्धटेकच्या गणपतीला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रचे साकडे घातले आहे. जरांडेश्वर कारखान्याचा मालक कोण ? हिम्मत असेल तर उत्तर द्या असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले. सत्तावीस हजार शेतकऱ्यांचे हित लुटण्याचे पाप अजित पवार यांनी केले आहे. अंबालिका कारखान्याचा पण हिशोब होणार आहे. त्यामुळे तो पुन्हा कर्जतच्या शेतकऱ्यांचा होणार हे निश्चित. “तो मी नव्हेच” पवार कुटुंबियाना छान जमते. भाजपाच्या ११उमेदवारांना विजयी करा आणि पवार कुटूंबियांना झटका द्या म्हणत कर्जतच्या जनतेला सोमय्या यांनी साद घातली.

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, पवार घराण्याचे नाव घेता आणि राजकारणात दबाव आणता. लोकशाहीने राजकारण खेळा तुम्हाला तुमची जागा निश्चित राम शिंदे या जनतेच्या सहकार्याने दाखवतो ते पहा. पण तुम्ही फोडाफोडीची राजकारण सुरू केले आहे जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल. नगरपंचायतीच्या निवडणुकीला हार्दिक पटेल आणला त्याच भाषण लोकांना कळलं का ते पहा आमदार साहेब. आता पुढे जिल्हा परिषदेला काँग्रेसचे गुलाबनबी आझादच आणतील. आणि पुढील विधानसभेला नक्कीच बराक ओबामा, जो बायडेंन, पुतीन नक्कीच आणतील म्हणत रोहित पवार यांचे नाव घेता टीकास्त्र सोडले. दोन वर्षे झाले लोक उतारे उशाशी घेवून झोपत आहे. आता जनतेनी हा आलेला उतारा उतरून दाखवावा. जे भावी आमदार होते ते एकाच कोट्यात बसले आहेत. त्यांची पंचाईत झाली आहे. भावी नाही आणि विद्यमान देखील नाही अशी अवस्था झाली आहे. तरुणांना वाहन परवाने आहेत, नोकऱ्या नाहीत, किती जणांचे लग्न लावले एकदा सांगाच. महिलांना बचतगटाचे आमिष दाखवले त्यांना देखील फसवले थोडी लाज धरा. खोटं बोलून राम शिंदेंनी कधीच राजकारण केले नाही. जे बोललो ते प्रत्यक्षात करून दाखवलं. आणि जनतेचे प्रश्न सोडवले. त्यामुळे भाजपाला साथ द्या तुम्हाला आणखी विकास निश्चित करून दाखवतो असे म्हणत उपस्थित जनसमुदायास आवाहन केले.    

यावेळी खा.सुजय विखे म्हणाले की, तो भाजपात होता दारूचे लायसन बंद. मुंबईत राष्ट्रवादीत केला लायसन सुरू. कर्जतकरानो कर्जत नगरपंचायत ताब्यात द्या. आता दारूबंदीच करतो. जेथे नामदेव राऊत टिकला नाही. तेथे तुमच्या सारखी सर्वसामान्य जनता काय टिकणार. कर्जत नगरपंचायतीची ही निवडणूक प्रतिष्ठेची, ना अस्तित्वाची ती कर्जतच्या स्वाभिमानाची आहे. कर्जतची जनता अभिमानी-स्वाभिमानी आहे. ते विरोधकांना त्यांची जागा निश्चित दाखवेल. जर उद्या राष्ट्रवादीची सत्ता आली तर टपऱ्या जाणार हे निश्चित. गोरगरीब नागरिकांची घरे पाडण्याचा प्रताप होणार आहे. कोरोना काळात लोकांना उत्पन्न नाही, संसार कसा चालवायचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन वर्षापासून नागरिकांना साधे दाखले काढण्यासाठी मोठी रक्कम पट्ट्या म्हणून घेण्याचा सपाटा सुरू आहे. आमच्या पक्षातील डाकू लोक तिकडे गेले आहे आता फक्त भाजपाचे खरे शिलेदार पक्षात आहे. ज्यांचे दारूचे दुकान, दवाखाना, शाळा, आलिशान गाड्या उभ्या आहेत तो शिंदे साहेबाचा होऊ शकला नाही असे म्हणत नामदेव राऊत यांना लक्ष्य केले. आठ महिन्यात साधा एक रस्ता करता आला नाही तो कर्जतचा विकास काय करणार ? आम्ही काम केले म्हणून आम्हाला मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यांना काही न करता मते मागण्याचा अधिकारी तरी आहे का ? असे म्हणत रोहित पवारावर बरसले. यामुळे दबाव, दडपशाही झुगारा आणि भाजपाला साथ द्या.          

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अल्लाउद्दीन काझी, शांतीलाल कोपनर, जामखेडचे माजी सभापती भगवान मुरूमकर, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, दादासाहेब सोनमाळी, अनिल गदादे, माजी नगरसेविका राणी गदादे, मुबीन बागवान, अड राहुल जामदार, आशा वाघ, शरद मेहत्रे, संजय भैलुमे, आबा खराडे, आरती थोरात, जिल्हासरचिटणीस सचिन पोटरे, कृषी उत्पन्नचे प्रकाश शिंदे, दादासाहेब सोनामाळी, उमेश जेवरे, पप्पू धोदाड, वैभव शहा, काका धांडे, राम ढेरे, ज्ञानदेव लष्कर, नंदलाल काळदाते, गणेश काळदाते, राहुल गांगर्डे, डॉ संदीप बरबडे, पांडुरंग क्षीरसागर, राहुल निंबोरे आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये नोटाचा वापर करा – मुबीन बागवान             

कर्जत नगरपंचायत निवडणूक विरोधकांनी खालची पातळीवर नेली. आमच्या उमेदवारांवर दबाव, दडपशाही आर्थिक आमिष दाखवत मागे घ्यायला लावले. आपल्या घरात कोणी सरकारी नोकर नाही. त्यामुळे विरोधक आपले काही करणार नाही. मी साधा फळ विक्रेता आहे. पण आता मी राम शिंदेचा साधा कार्यकर्ता झालो आहे. मी भाजपाकडून अर्ज भरला होता मात्र समोरचा माणसाने मला उभा राहायचे होते म्हणून केवळ समाज प्रतिनिधी म्हणून रत्नमाला साळुंकेताई आणि मी उमेदवारी अर्ज काढून घेतला. मात्र त्याच उमेदवाराने भाजपाचा आणि माजीमंत्री राम शिंदे यांचा विश्वासघात केला व राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता समोरच्याना त्यांची जागा दाखवायची असेल तर सर्वसामान्य मतदारांनी नोटाचा पर्याय वापरत पुन्हा प्रभाग क्रमांक १४ ची निवडणूक घ्यायला लावावी अशी विनंती बागवान यांनी केली. 

आमदार साहेब विधानसभेला ज्यांनी तुमची सेवा केली त्यांनाच तुम्ही डावळले – दादा सोनमाळी       

दोन महिन्यांपूर्वी जे आमदार बोलत होते. ते विसरले आहे. सुशिक्षित आणि निष्ठावान पदाधिकारी यांना उमेदवारी देणार होते. मात्र सर्व्हेमध्ये राष्ट्रवादीला जागा मिळत नव्हत्या. लगेच लोकांवर दबाव, दडपशाही, नोकरदार असणाऱ्याना त्रास करीत पक्षात घेतले. आणि निष्ठावानांना वाऱ्यावर सोडले म्हणत रोहित पवार यांना लक्ष्य केले. निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना काढण्याचे पाप आपण केले. मात्र कर्जतची जनता विसरणार नाही तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील असा विश्वास आहे. 

महिला उमेदवारांना अपहरण करण्याचे पाप विद्यमान आमदारांनी केले – अनिल गदादे       

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधीनी खालची पातळी घेत राजकारण केले. भाजपाच्या तिन्ही महिला उमेदवारांना अक्षरक्षा अपहरण करीत त्यांचे उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा प्रताप आ पवार यांनी केला. कर्जतच्या जनतेला फसविण्यात ते धन्यता मानत आहे. जनतेला भूलथापा मारायचे आणि राजकीय पोळी भाजन्याचा धंदा सुरू आहे. 

चिल्लर कार्यकर्त्याना शिंदे साहेबांनी बंदा रुपया केला, हेच राऊत तिकडे थिल्लर झाले – सचिन पोटरे      

ज्यांना पक्षात महत्वाचे स्थान तिकडे साधे कार्यकर्ते झाले. आज तोच सनम बेवफा झाला म्हणत नामदेव राऊत यांच्यावर पोटरे यांनी हल्ला चढविला. राम शिंदे यांनी कर्जत शहराचा चेहरा-मोहरा निधी उपलब्ध करीत बदलला. विद्यमान आमदारांनी केवळ आश्वासने दिली काम मात्र काहीच केले नाही. 

मस्ती आली म्हणून विधानसभेला बदल केला मात्र तो अंगलट आला – अंबादास पिसाळ           

विधानसभा निवडणुकीला सगळ्यानाच  मस्ती आली होती. मात्र ती मतदारसंघाच्या चांगलीच अंगलट आली आहे. मात्र यंदाच्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत त्यांना बिन दाव्याची फाशी देऊ असे म्हणत उपस्थित जनसमुदायास भाजपाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. काही करा पण प्रभाग क्रमांक १२ मध्ये त्याची जिरवा. भाजपाचा वाघ तिकडे मांजर झाल्याचे जनता पाहत आहे असे म्हणत नामदेव राऊतांवर हल्ला चढविला.

ज्यांच्या बायकांची संख्या महाराष्ट्रला माहीत नाही ते धनंजय मुंडे कर्जतच्या सभेला. ज्याच्यामध्ये नैतिकता नाही असा गुजरातचा हार्दिक पटेल आणत आ.रोहित पवार यांनी त्यांची राजकारणातली नैतिकता दाखवली. तुम्ही आजोबांच्या नावावर राजकारण करीत आहे मी स्वताच्या जीवावर राजकारण करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी फटकारले. 

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here