राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अहमदनगरला व्हावी या साठी प्रयत्न करणार – आ.संग्राम जगताप

राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी

अहमदनगर,दि.१४ मार्च,(प्रतिनिधी)
राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अहमदनगर येथे आयोजित व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अहमदनगर शहर अध्यक्ष श्रेणिक शिंगवी यांनी आ.संग्राम जगताप यांचे कडे पत्राद्वारे मागणी केली आहे. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान, अ.भा.नाट्य परिषद माध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळाचे सदस्य सतीश शिंगटे, नाट्य सिने अभिनेते मोहिनीराज गटणे नाट्यकर्मी रितेश साळुंके, अनंत रिसे उपस्थित होते.

मागणी केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य.संचलनालय
आयोजित ६० वी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी विविध केंद्रांवर संपन्न झाली आहे. जगातील सातत्याने ६० वर्ष आयोजन होत असलेली ही एकमेव स्पर्धा आहे. सदर स्पर्धेची अंतिम फेरी आज पर्यंत विविध शहरात संपन्न झाली असून राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीचे अहमदनगर येथे अद्याप आयोजन झाले नाही.
आ.संग्राम जगताप म्हणाले की,
अहमदनगर शहर नाट्य-सांस्कृतिक- चित्रपट क्षेत्रात अग्रेसर असून रसिक नागरिकांचे शहर आहे. ६० व्या राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अहमदनगर येथे आयोजित व्हावी या साठी मा.सांस्कृतिक मंत्री ना.अमितजी देशमुख यांची भेट घेऊन विनंती करून अहमदनगरच्या नाट्यप्रेमींना ही संधी उपलब्ध व्हावी या साठी प्रयत्न करणार आहे.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल श्रेणिक शिंगवी यांचा आ.संग्राम भैय्या जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमित खामकर, नाट्यकर्मी सर्वश्री सतीश लोटके, मोहिनीराज गटणे, शशिकांत नजान, सतीश शिंगटे, रितेश साळुंके, दीपक शर्मा, अनंत रिसे, नाना मोरे, दत्ताभाऊ पवार, गणेश लिमकर, शैलेश देशमुख, देवीप्रसाद सोहोनी, प्रीतम होणराव, सुदर्शन कुलकर्णी, तेजस अतितकर, श्रीमती श्रिया देशमुख, कु.आरती अकोलकरउपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here