पुण्यात स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

अहमदनगर,दि.४ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामागारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये अन्य पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांपासून तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले. कटरच्या साहाय्याने जाळी कापून कामगारांना बाहेर काढण्यात आलं. अडकलेल्या पाच जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिलीय. पाच जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. हे कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here