पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी बीई, बी. टीच, बीडीएस, एमबीबीएस, बी. ईडी, बीबीए, बीसीए, बी फार्मा, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमासाठी १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर या प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांसाठी सदर शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी विहीत नमूण्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अथवा www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. सदर शिष्यवृत्तीचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडे पाठविण्यात येणार आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर येथे जमा करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे आवाहन विजय बा. वाघचौरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here