दिव्यांग आणि बेड रिडन नागरिकांच्या लसीकरणासाठी महानगरपालिका येथे संपर्क साधावा

आयुक्त शंकर गोरे यांचे आवाहन

अहमदनगर,दि.१५ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – शहरातील दिव्यांग आणि बेड रिडन नागरिकांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य नाही त्यांनी महानगरपालिका येथे संपर्क करण्याचे आवाहन मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे. ज्या नागरिकांना दीर्घ आजार, वार्धक्य किंवा इतर कारणाने महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाणे आणि रांगेत उभे राहाणे शक्य नाही. जे बेड रीडन दिव्यांग आहेत, त्या नागरिकांसाठी घरी जाऊन लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी सदर नागरिकांनी या योजनेत नाव नोंदवून लसीकरण करून घ्यायचे आहे असे आवाहन आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी
महापालिका कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान
९८५०१४६६११ तसेच योगेश औटी (आरोग्य विभाग) ८०५५५५५५७३
या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here