हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा मृत्यू

अहमदनगर,दि.८ डिसेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – भारताचे सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण १४ लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDS जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हवाईदलाचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाने संरक्षण दलाचा प्रमुख गमावला आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होते.

जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टरमधील १३ जणांनी प्राण गमावले. यामध्ये भारतीय लष्करातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेबाबत देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर बिपीन रावत यांच्या निधनावर दु:ख आणि खेद व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी रावत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिपिन रावत यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here