नगर शहरात पाच ठिकाणी मोफत रक्तशर्करा तपासणी मोहीम

रोटरी क्लब मिडटाऊनचा उपक्रम

अहमदनगर,दि.२७ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – देशात वाढणाऱ्या मधुमेह आजरा बाबत जनजागृती होण्यासाठी तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी रोटरी क्लब मिडटाऊन व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२९ सप्टेंबर रोजी नगर शहरात ५ ठिकाणी नि:शुल्क्य रक्तशर्करा तपासणी होणार आहे. एकाच दिवशी सर्वात जास्त रक्तशर्करा तपासण्या करण्याचा मानस आहे, अशी माहिती रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षा प्रा.किरण कारला यांनी दिली.

रोटरी क्लब मिडटाऊनच्या सचिव आर्किटेक्ट कल्पना गांधी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जीवनधारा हॉस्पिटलच्या सहकार्याने बुधवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० ते ९ वाजेपर्यत नगर क्लब भुईकोट किल्ल्या जवळ व सावेडी जॉगिंग ट्रक, सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत दिल्लीगेट येथील गॅलॅक्सी हॉस्पिटल, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत ओबेरॉय हॉटेल समोरील जीवनधारा हॉस्पिटल सावेडी व दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत एमआयडीसी क्लस्टर ऑफिसमध्ये आदी केंद्रांवर नागरिकांची मोफत रक्तशर्करा तपासणी होणार आहे. या तपासण्यासाठी करोनाचे सर्व नियमांचे पालन होणार आहे.
जास्तीतजास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रोजेक्ट प्रमुख डॉ.विनोद मोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here