नगर शहरात दमदार पाऊस, रस्त्याला नदीचे स्वरूप

अहमदनगर,दि.९ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आज दुपारी सुरु झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुर्दशा केली. विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे नगर शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. वाहने, बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या.

नगर शहरासह,पाथर्डी, राहुरी, नेवासा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह तासभर दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे वाहने, बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या. नगर शहराच्या मध्यवस्तीतील आनंदी बाजार परिसरात पावसाच्या पाण्यात दुचाकी-चारचाकी वाहने बुडाली. तीन वाजता पावसाला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात धुवाधार पावसाने नगर शहरात पाणीच पाणी झाले.

त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डोह साठले. तसेच अनेक सखल भागात पाणी शिरले. या पावसामुळे नगरकरांची दाणादाण उडालीच शिवाय शहरातील गौरीघुमट,आनंदी बाजार रोडला नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून अनेक रस्त्यांना नाल्याचे रूप आले. शहरासह जिल्ह्याच्या सर्वदूर भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here