नगर मनपा आणि रेडिओ सिटी यांच्यावतीने दिव्यांग आणि बेडरिडन नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण

अहमदनगर,दि.६ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिका आणि रेडिओ सिटी ९१.१ एफ एम यांच्यावतीने आयोजित दिव्यांग आणि बेड रिडन नागरिकांच्या लसीकरणाला अहमदनगर महानगरपालिका उपायुक्त यशवंत डांगे, कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान, आर जे प्रसन्न पाठक यांचे उपस्थितीत सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सावेडी विभागातील नोंदणी केलेल्या दिव्यांग आणि बेड रिडन लोकांना लस देण्यात आली.

यावेळी दक्षता पथक सहायक नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, सूर्यभान देवघडे, भास्कर आकुबत्तीनं, अमोल लहारे, अनिल आढाव, राजेश आनंद, विष्णू देशमुख, राजू जाधव, रिजवान शेख, रवींद्र सोनवणे उपस्थित होते. लसीकरण करण्यासाठी महापालिका सिव्हिल आरोग्य केंद्राचे डॉ. मनोहर देशपांडे, सिस्टर ज्योती बांगर,स्नेहलता क्षेत्रे,
वर्षा कोल्हे,डेटा ऑपरेटर ओंकार अंकाराम यांचे सहकार्य लाभले.
सुरवातीला ५० नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यात येत असून सदर मोहीम पुढेही सुरू असणार आहे.

आपल्या कुटुंबातही जर कोणी दिव्यांग किंवा बेड रिडन व्यक्ती असेल तर आपण त्यांचे नाव नोंदवू शकता आणि या सुविधेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी ७७१८९११९११ या नंबर वर लस घ्यायची असलेल्या व्यक्तीचे नाव आणि लसिकरण केंद्रापर्यंत का पोहोचू शकत नाही त्याचे कारण टाकावे असे आवाहन आयुक्त शंकर गोरे, आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here