गृहमंत्री वळसे पाटलांनी नगरमध्ये केली मोठी घोषणा, राज्यात मोठी पोलीस भरती होणार

अहमदनगर,दि.२९ जानेवारी,(प्रतिनिधी) – राज्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात आता मोठी पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शुक्रवारी अहमदगनर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या (Ahmednagar Police) कामाचा आढावा घेतला.यानंतर गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलातील भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली आहे. पोलीस खात्यात आता नव्याने 7 हजार 200 पदांसाठी भरती (Recruitment for 7200 posts in Police department) होणार आहे. राज्य मंत्रिडळात या संदर्भात निर्णय झाला असून लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, पोलीस भरतीच्या संदर्भात राज्यात 5200 पोलिसांच्या भरतीचं काम जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. लेखी परीक्षा झाल्या, शारीरिक चाचण्या झाल्या आहेत. आता त्याची अंतिम यादी करण्याचं काम सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. ती पहिल्या भरतीची प्रक्रिया संपल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

आता या संदर्भातील अंतिम यादी जाहीर करण्याचं काम आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी 7200 पोलिसांच्या भरतीच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आणि या संदर्भातील भरती प्रक्रियेची सुरुवात आता येत्या काही दिवसात सुरू करायची आहे असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here