महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखा अध्यक्षपदी किशोर मरकड यांची निवड

अहमदनगर,दि.१ डिसेंबर,(प्रतिनिधी) – साहित्यक्षेत्रातील अत्यंत जुनी व महत्त्वाची समजली जाणारी महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या साहित्य संस्थेच्या नगर शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष पत्रकार किशोर मरकड यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी प्रयत्न नर्सिंग होमच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के होते. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पालवे यांनी निवडणूक अधिकारी  म्हणून भूमिका पार पाडली.

यामध्ये निवडण्यात आलेले कार्यकारिणी मंडळ पुढीलप्रमाणे अध्यक्ष किशोर मरकड कार्यकारिणी सदस्य- अनिरुद्ध देवचक्के, प्रा मेधाताई काळे, प्रा. शिरीष मोडक, चंद्रकांत पालवे, प्रा.चंद्रकांत जोशी, शिल्पा रसाळ, संजय कळमकर, दशरथ खोसे, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, डॉ. शितल म्हस्के, डॉ. श्याम शिंदे, प्रा. रवींद्र देवढे, शिवाजीराव साबळे, पोपटराव धामणे, डॉ. क्रांतीताई अनभुले, नसीर शेख, सुधीर लंके, गणेश भगत, प्राचार्य विश्वासराव काळे, राजेंद्र चोभे, अरविंद ब्राम्हणे, डॉ शरद सांब यांची निवड करण्यात आली.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सहसचिव शिल्पा रसाळ यांनी केले. विषय पत्रिकेचे व इतिवृत्त वाचन सचिव प्रा चंद्रकांत जोशी यांनी केले, खजिनदार दशरथ खोसे यांनी आर्थिक ताळेबंद सादर केला. यावेळी झालेल्या चर्चेत सभासद सुनिल गोसावी, भगवान राउत, श्याम शिंदे, प्राचार्य विश्वासराव काळे, एस. यु. खान, संजय कळमकर, डॉ.रवींद्र दगडे, वैशाली मरकड,यांनी भाग घेतला. यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के म्हणाले की, माझ्या कार्य काळामध्ये साहित्यिक व्यासपीठ निर्माण करून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले. वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम राबवले हे राबवताना कार्यकारी मंडळाने मला मौलिक सहकार्य केले.

नूतन अध्यक्ष किशोर मरकड म्हणाले की, गेली पंचवीस वर्षापासून मी महाराष्ट्र साहित्य परिषदेशी जोडलो गेलो आहे. दोन वेळा सचिव, कार्याध्यक्ष ही पदे भूषवत असताना मला साहित्य सेवा करता आली त्यातूनच मला आज सभासदांनी एकमताने अध्यक्षपदाची संधी दिली. ही चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
यावेळी चंद्रकांत पालवे यांनी अमदनगर शाखेचे कामकाज उत्कृष्ट असल्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सभासद प्रा.शिरीष मोडक, प्रा.मेधाताई काळे, शिल्पा रसाळ, पीएचडी मिळाल्याबद्दल श्याम शिंदे, साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत जोशी, शासकीय मराठी समितीवर निवड झाल्याबद्दल किशोर मरकड, संजय कळमकर, राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव धामणे, शब्दगंध साहित्य परिषदेचा आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक सुनिल गोसावी, राजेंद्र उदागे, भगवान राऊत यांचा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here