ईडी कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली

मुंबई,दि.२५ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ईडीनं बुधवारी आठ तासांच्या चौकशीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. अशातच नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तपासणीसाठी मुंबईतील भायखळा येथे असलेल्या जे. जे. रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर पोटदुखीची समस्या वाढल्यानं नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली होती.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. ईडीनं २३ फेब्रुवारी रोजी सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. 

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here