अहमदनगरकरांनी अनुभवली ‘स्वातंत्र्याची अमृत पहाट’

तिरंगा फौंडेशनच्या चा उपक्रम कौतुकास्पद – आयुक्त पंकज जावळे

अहमदनगर,दि.१६ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – आपल्या भारत देशाला स्वतंत्रता मिळून ७५ वर्ष झाली असून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी तिरंगा फौंडेशनच्या वतीने तिसऱ्या वर्धापन दिन निमित्ताने प्रोफेसर चौकात ‘स्वातंत्र्याची अमृत पहाट’ हा आगळा वेगळा उपक्रम नगरकरांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत देशभक्ती पर गीतांवर ठेका धरला. देशभक्तीपर गीतांसाठी खास अजितसिंग यांनी विशेष गाण्याचे सादरीकरण करत अहमदनगर मधील नागरिकांना एका विशेष शैलीत मंत्रमुग्ध केले. यावेळेस स्वातंत्र्य सैनिक, आपल्या शहरातील सेवानिवृत्त जवान, कोरोना काळात लढा देणारे डॉक्टर आदी नागरिकांचा सन्मान कार्यात आला.

या कार्यक्रमासाठी अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केले. तसेच यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपआयुक्त प्रदीप पठारे, सर्व अँप चे गौरव फिरोदिया, मेहेरप्रकाश तिवारी, टच फौंडेशन चे गौतम मुनोत, आय लव्ह नगर चे नरेंद्र फिरोदिया, महिला बाल कल्याण समिती सभापती पुष्पा ताई बोरुडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर सुरेखाताई कदम, संजय शिंगवी, संभाजी कदम, तन्मय घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
              

अमृतमहोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कार्याचा गौरव आणि एकात्मतेची  भावना नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी भारत सरकारच्या  “हर  घर तिरंगा” संकल्पनेला प्रतिसाद देत  दिनांक १३ ते १५ ऑगस्ट रोजी आपल्या  देशाचा राष्ट्रध्वज आपल्या घरावर सन्मानाने लावण्यासाठी  तिरंगा फौंडेशन ने आणि ए पी इंकॉर्प यांनी 4000 लोकांना राष्ट्रध्वज  सर्व अँप द्वारे सन्मानाने घरोघरी पोहोच करत जनजागृती केली.

तसेच कार्यक्रमात डिजिटल झेंडा वंदन करत लालकिला वरील प्रक्षेपण लाईव्ह  करण्यात आले होते. आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी श्री तालयोगी प्रतिष्ठान मार्फत विशेष वादन करत नगरकरांना स्वतंत्र दिन संकल्प दिन अंतर्गत पर्यावरण पूरक सण  साजरा करण्याची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी तिरंगा फौंडेशन च्या प्रत्येक सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनेश खत्ती यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत अतुल डागा, आशिष देसर्डा , योगेश चुत्तर, आकाश भन्साळी, दिनेश भाटिया, रोहित बालदोटा , राहुल मुथा,आनंद अग्रवाल, दीपक पापडेजा, अमित आंदोत्रा, संतोष तनपुरे, दयानंद वाबळे, प्रवीण बेंद्रे आदी सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचलन आर जे प्रसन्न यांनी केले. अहमदनगर शहरात तिरंगा फौंडेशन काही वर्षात खेळ आणि सामाजिक उपक्रम सातत्याने आपल्या नागरिकांसाठी राबवित असतात आणि या पुढील काळात आपल्या अहमदनगर चे नाव उंचावण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here