भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी

अहमदनगर,दि.१६ एप्रिल,(प्रतिनिधी) – भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायनेटिक चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रदेश प्रभारी मनोज पांगरकर, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, संघटन सरचिटणीस अँड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदेव, शहर जिल्हा चिटणीस मिलिंद भालसिंग, गीतांजली काळे, नगरसेवक पल्लवी जाधव, शहराध्यक्ष कुसुमताई शेलार, लीलाताई अग्रवाल, संध्या पावसे, नगरसेवक सौ.लताताई शेळके, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेवक प्रदीप परदेशी, मा नगरसेवक नितीन शेलार, विशाल खैरे, सतीश खैरे, अँड.किरण भिंगारदिवे, सागर वाकळे, रोहन शेलार, रियाज कुरेशी, पंकज जहागीरदार, अशोक भोसले, लक्ष्मीकांत तिवारी, सुनील सकट, राजू घोरपडे, साहेबराव काते, अमोल निस्ताने, बंटी ढापसे, राहुल रासकर, ज्ञानेश्वर धिरडे, सुमित बटुळे, संदेश रपरीया, चिराग शह, संतोष गायकवाड, मंगेश खंगले, दिपक उमाप, श्याम साळवे, राम सकट, जाधव साहेब, सुजय खरमाळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.   

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने अहमदनगर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. कायनेटिक चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सफाई कर्मचारी महिलांना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने साड्या वाटप करून रॅली काढण्यात आली रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्केटयार्ड येथील पुतळ्यापाशी जाऊन अभिवादन करण्यात आले व शहरातील विविध ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटोळे व शहर जिल्हा चिटणीस मिलिंद भालसिंग यांनी दिली.                                           

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here