वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरीसाठी नगर तालुका कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

निमगाव वाघात दि.२३ ऑक्टोबरला आयोजन

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवार दि.२३ ऑक्टोबर रोजी ६४ वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२०-२१ स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील कुस्तीगिरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अभिषेक भगत, उपाध्यक्ष काशिनाथ पळसकर, सहसचिव सुभाष नरवडे, खजिनदार किसन वाबळे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

या स्पर्धेचे शुभारंभ जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ ते दहा या वेळेत वजनासाठी मल्लांना उपस्थित रहावे. वजनानंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पंच म्हणून एनआयएस कुस्ती कोच गणेश जाधव काम पाहणार आहे. स्पर्धेसाठी ५७,६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व महाराष्ट्र केसरी गटसाठी ८६ ते १२५ किलो वजनगट (गादी व माती) देण्यात आले आहेत. कोरोना नियमाचे पालन करुन ही स्पर्धा संपन्न होणार आहे. स्पर्धेला येताना खेळाडूंनी खेळाडूंनी पासपोर्ट फोटो व आधारकार्ड सोबत आनणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे ९२२६७३५३४६ यांना सपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here