पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

अहमदनगर,दि.१ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकजा मुंडेंना याआधी एप्रिल २०२० मध्येदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ओमायक्रोची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज समोर आला असून त्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “करोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.”

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती दिली. “काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here