राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पारनेर तालुक्याला मिळाले सुवर्ण व रौप्य पदके

मयुरी झरेकर सुवर्णपदक तर निकिता औटी रौप्य पदक मिळवत सर्वोत्तम कामगिरी

पारनेर,दि.४ सप्टेंबर,(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्तरावरील किकबॉक्सिंग स्पर्धेत पारनेर तालुक्यातील मयुरी झरेकर हिने सुवर्णपदक तर निकिता औटी हिने रौप्य पदक मिळवत उत्तम कामगिरी केली.
गोवा या ठिकाणी म्हापसा येथे मल्टिपर्पज इनडोअर स्टेडियम दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल, म्हापसा गोवा येथे पार पडलेल्या वाको इंडिया सीनिअर अँड मास्टर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यावेळी भारतातून विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले किक बॉक्सिंग स्पर्धक या राष्ट्रीय स्पर्धेसाठी उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ३५ सुवर्ण पदक. १९ रौप्य पदक व २७ कांस्य पदका सहित प्रथम क्रमांकाचा चषक मिळविला.

गोवा या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील मयुरी लक्ष्मण झरेकर व पारनेर शहरातील निकिता शिवाजी औटी यांनी भाग घेतला. या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत मयुरी लक्ष्मण दरेकर हिने सुवर्ण तर निकिता शिवाजी औटी हिने रौप्य पदक मिळवत पारनेर तालुक्याची शान राष्ट्रीय स्तरावर उंचावली
त्यांनी केलेल्या या सर्वोत्तम कामगिरी मध्ये किक बॉक्सिंग प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच असलेल्या राजेश्वरी कोठावळे यांचे त्यांना सरावा दरम्यान व स्पर्धेत विशेष मार्गदर्शन लाभले.
दरम्यान यापूर्वीही मयुरी झरेकर व निकिता औटी यांनी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करत अनेक पदके व सन्मान चिन्हे मिळवली असून त्यांना या दरम्यान वेळोवेळी राजेश्वरी कोठावळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

दरम्यान गोवा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक व रौप्य पदक मिळवत मयुरी झरेकर व निकिता औटी यांनी आपल्या पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मध्ये नक्कीच मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे पारनेर तालुक्याचा गौरव हा राष्ट्रीय स्तरावर निश्चित झाला आहे.

पारनेर तालुक्याचे भूषण सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या वाको किकबॉक्सिंग महाराष्ट्र संघटनेच्या सदस्य राजेश्वरी कोठावळे या उत्तम किक बॉक्सिंग व कराटे खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर एक पंच म्हणून काम करत आहेत. त्यांनी आज पर्यंत पारनेर तालुक्यात जवळजवळ दहा हजार खेळाडूंना किक बॉक्सिंग व कराटेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे. त्या खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे.
मयुरी झरेकर हिने सुवर्णपदक व निकिता औटी हिने रौप्यपदक मिळवल्यामुळे पारनेरचे आमदार निलेश लंके, वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल व वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष नीलेश शेलार व आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक राजेश्वरी कोठावळे यांनी उत्तम कामगिरी केलेल्या या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.


मयुरी झरेकर हिची सुवर्णमय कामगिरी !

सर्वसामान्य कुटुंबातून येऊन संघर्ष करत किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवत मयुरी झरेकर हिने पारनेर तालुक्याची राष्ट्रीय स्तरावर मान उंचावत सुवर्णमय कामगिरी केली आहे. संघर्ष करत आपल्या खेळाच्या माध्यमातून मयुरी झरेकर ही यशाची एक एक पाऊल चढत आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या सुवर्णमय कामगिरीचे आता तालुक्यातून विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


राजेश्वरी कोठावळे यांचे विशेष मार्गदर्शन !

आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक असलेल्या पारनेर तालुक्याचे भूषण राजेश्वरी कोठावळे यांनी सुवर्णपदक विजेती खेळाडू मयूरी झरेकर व रौप्य पदक विजेती खेळाडू निकिता औटी यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. या खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षक म्हणून राजेश्वरी कोठावळे यांनी घेतलेले कष्ट नक्कीच कौतुकास पात्र आहे. यांच्या सर्वांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे पारनेर तालुक्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here