अ.भा. मराठी नाट्य परिषद नगर शाखेच्या कलेंडरचे आ.संग्राम जगताप यांचे हस्ते प्रकाशन

नाटक, सिनेमा, मालिका आणि वेबसिरीजमध्ये अहमदनगरच्या कलाकारांचा वाटा मोठा – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर,दि.३१ जानेवारी,(प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर येथे आमदार संग्राम जगताप व मा.डॉ. प्रकाश रसाळ यांच्या शुभहस्ते नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, उपाध्यक्ष शशिकांत नजान, प्रा.डॉ. श्याम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की अहमदनगरच्या नाट्य सांस्कृतिक चळवळीला दिशा देत असताना कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करून नवनवीन संधी निर्माण करण्यात येते. नाट्य सांस्कृतिक क्षेत्राचा इतिहास जतन करताना नवीन इतिहास लिहिला जात आहे. नाटक,सिनेमा, मालिका वेबसिरीज माध्यमात अहमदनगरच्या कलाकारांनी मोठे यश मिळविले आहे ही बाब अभिमानास्पद आहे. शहरातील नाट्य सांस्कृतिक विकासासाठी विविध योजना राबविण्यासाठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेस आपले पूर्ण सहकार्य राहील असेही आ.मा.श्री.संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ.प्रकाश रसाळ म्हणाले की ज्या शहराची सांस्कृतिक चळवळ प्रभावी असते ते शहर सुसंस्कृत होते. येथील कलाकारांनी देशपातळीवर आपल्या अहमदनगर चे नावलौकिक वाढविले आहे.
यावेळी नाट्य परिषद माध्यवर्तीचे नियामक मंडळ सदस्य सतीश शिंगटे, नगर शाखेचे पदाधिकारी व सदस्य रितेश साळुंके, तुषार चोरडिया, अभिजित दळवी, शिवाजी शिवचरण, पुष्कर तांबोळी, श्रीमती शुभांगी कुंभार, विशाल कडूस्कर, गणेश लिमकर, प्रा.योगेश विलायते तसेच राजेश भालेराव उपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here