राहुरीच्या कन्येने मिळवला मिस महाराष्ट्र सेकंड रनर अप क्राउन

राहुरी,दि.२३ डिसेंबर,(प्रतिनिधी) – फॉरएवर स्टार इंडिया अवार्ड्स आयोजित मिस इंडिया २०२१ स्पर्धेत राहुरीची कन्या सृष्टी विजय कदम हिने मिस अहमदनगर फर्स्ट रनर अप क्राउन सह मिस महाराष्ट्र सेकंड रनर अप क्राउन मिळविला आहे.
जयपुर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शानदार कार्यक्रमात तिला हा बहुमान देऊन गौरविण्यात आले आहे.

तिला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने या क्षेत्रात पदविका कोर्स केलेला आहे. तसेच तिने नुकतीच अन्न तंत्रज्ञान विषयात बी. टेक. पदवी संपादन केली आहे. मुलीच्या कलगुणांना वाव देण्यासाठी आई सौ. सुनिता कदम व वडिल विजय कदम यांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.
प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका व जिल्हा समन्वय समिती पदाधिकारी, शिक्षक मित्र परिवार, हितचिंतक व आपतेष्ट यांनी अभिनंदन केले असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here