संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत भाजपावर खोचक टीका

मुंबई,दि.१५ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली आहे.  या पत्रकार परिषदेची खूपच चर्चा झाली आहे. यामध्ये ते कुणावर आणि काय आरोप करणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाभवनात ही पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. भाजपच्या साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे नेते कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी सुरुवातीलाच भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही या सरकारच्या वाटेतून बाजूला व्हा, तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईप करतील. त्यानुसार दिल्लीत सिद्धता झाली आहे. तुम्ही मदत केली नाही तर तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, त्यांचा दबाव, एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये १७० चं बहुमत असताना भाजपचे लोक सरकार पडण्याची एक तारीख देतात, ती कशाच्या आधारावर देतात? यासंदर्भात मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे त्रास देत आहेत, याबाबत तक्रार केली आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहेत. त्यांना सुद्धा टाईप करु, असं सांगण्यात आलं. त्यानंतर ईडीचे लोक पवार कुटुंबियांवर धाडी टाकू लागले. ईडी तर आहेच, त्याचबरोबर केंद्रीय पोलिस बल लावू, त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्यावर आणि निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडायला लागल्या. मुलुंडचा दलाल (किरीट सोमय्या) सांगतो की आता संजय राऊतांवर धाडी पडत आहेत. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून याप्रकारे सूड उगवत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही झुकू? हे शक्य नाही.

पुढे त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांचा उल्लेख मुलुंडचा दलाल असं करत म्हटलंय की त्यांनी आरोप केलाय की, कोरलाई गावात १९ बंगले बांधून ठेवले आहेत. माझं आव्हान आहे की, कधीही सांगा आपण चार बसेस करु आणि १९ बंगल्यांमध्ये पत्रकारांची पिकनीक काढू. जर बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन. जर दिसले नाहीत तर संपूर्ण शिवसेना जोड्याने मारेल. आपण ४ गाड्या करून त्या १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन , दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी, चला दाखवू त्यांना…

लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा. मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असूया, हायकोर्टात सोमय्यांनी मराठी भाषा मुंबईतून, शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी धाव घेतली होती. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, आणि मुंबईत मराठी कट्टा चालवता? असा सवालही त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, आतापर्यंत आपण आरोपांना कधीच उत्तर दिलं नव्हतं. पण आता देणार… काय सत्य आहे ते मांडणार आहे. आमची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यलयापासून घ्यायचं डोक्यात होतं. पण आता सुरुवात इथं आणि शेवट तिथे होईल. महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे.

पीएमसी बँक घोटाळा किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या असून याबाबत तीन वेळेस भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे ईडीकडे दिली आहेत. मात्र या बाबत दुर्लक्ष होत आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करावी असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here