ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे ८३व्या वर्षी निधन

अहमदनगर,दि.१२ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते गेल्या काही वर्षापासून कॅन्सरशी झुंज देत होते. आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे मल्टी ॲार्गन फेल्यूअरमुळे निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास सोडला. यानंतर सोशल मीडियावर अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. पुण्यातील आकर्डी येथील बजाजच्या प्लांटमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून एमबीए चे देखील शिक्षण घेतले होते. १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. ते काही काळ राज्यसभेचे खासदारही होते. त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here