गुरू रविदास साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी शब्दगंधचे सुभाष सोनवणेंची निवड

राहुरी,दि.१९ डिसेंबर,(प्रतिनिधी) – हातगाव जि.नांदेड येथे होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय गुरू रविदास साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शब्दगंधचे उपाध्यक्ष कवी सुभाष सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सुभाष सोनवणे हे सेवानिवृत पोलीस अधिकारी असुन अध्यक्ष साहित्यिक विभाग महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघ, उपाध्यक्ष म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषद  उपाध्यक्ष निसर्ग मित्र समिती मध्ये कार्यरत आहेत.       

त्यांचे ‘व्यथीत सावल्या’ व ‘स्नेहबंध’ हे पुस्तकं प्रसिद्ध असुन ते वृत्तपत्रांमधून कथा, कवीता व विविध विषयावर लेख लिहितात. त्यांनी जयहिंद, मुसंडी या चित्रपटात व इनमीन साडेतीन, आशा अभिलाशा या मराठी मालिकामध्ये भूमिका केल्या आहेत, आकाशवाणीच्या पुणे, अहमदनगर केंद्रावर काव्यसादरीकरण व मुलाखती प्रसारित आहेत. यापूर्वी त्याना ‘महात्मा फुले फेलोशीप’, विर-भारती, काव्ययात्री पुरस्कर, कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, समाजभुषण’ यासह १७ पुरस्कार मिळाले आहेत.   

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, भगवान राऊत, ज्ञानदेव पांडुळे, डॉ.अशोक कानडे, शर्मिला गोसावी, चर्मकार संघाचे संजय खामकर, प्रबोधनकार भाऊ थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here