शिवसेना कार्यकर्त्याची गळफास घेत आत्महत्या..?

नगर तालुका,दि.२७ मार्च,(शिवा म्हस्के) – नगर तालुक्यातील वाळुंज-अरणगाव बायपास रस्त्याच्या कडेला असलेला आंब्याची बाग आहे. या बागेची निगराणी देखभाल करणाऱ्या कामगारांना बागेत काम करत असताना (दि.२५) च्या सकाळी एका आंब्याच्या झाडाला आज्ञात ईसम गळफासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर हि बातमी वाऱ्या सारखी आसपासच्या परिसरात पसल्याने बंघ्याची गर्दी जमा झाली. ही घटना नगर तालुका पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर घटना स्थळी नगर तालुका पोलिस दाखल झाले.

गळफास घेतल्या ईसमाची ओळख पटवत असताना नागरिकांनी हा इसम शिराढोण गावचा असल्याचे सांगितल्या नंतर सदर व्यक्तीची खात्री केल्यावर सुदाम रामदास वाघ (वय ४५, राहणार शिराढोण गाव) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्या नंतर पुढील उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर या ठिकाणी पाठवुन दिले व दि.२५ रोजी रात्री उशिरा शिराढोण गावात शोकांकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. सदर घटनेचा तपास नगर तालुका पोलीस करत आहे.

काही दिवसांपूर्वीच वाघ कुटुंबातील नाशिक येथे मनमाडच्या डोंगरावर गिर्यारोहण करत असताना गिर्यारोहक अनिल शिवाजी वाघ हा अपघात घडुन गतप्राण झाला होता. अनिल वाघ व सुदाम वाघ दोघे बंधू होते. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने वाघ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here