डॉ.सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा, सुपारी देऊन केली हत्या

अहमदनगर,दि.४ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – नाशिक महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृत्यूदेह २६ जानेवारीला मुंबई-नाशिक महामार्गावर वाडीवऱ्हे परिसरात कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला होता. गाडीत आढळलेला मृतदेह आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले होते. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू कसा झाला, यावर अनेक दिवसापासून प्रश्नचिन्ह लावले जात होते. परंतु आता डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ अखेर सुटलंय.

वाजे यांची जळालेल्या अवस्थेतील कार सापडल्यानंतर नेमकी ही दुर्घटना आहे की घातपात त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र डिएनए चाचणीनंतर वाजे यांचा घातपात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत मारेकऱ्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी अखेर या प्रकरणाला तडीस लावलं आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पण अखेर १० दिवसाच्या तपासानंतर या प्रकरणात यूटर्न आला आणि डॉ सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे याला अटक केली आहे. संदीप वाजे यांनी आपल्या पत्नीची सुपारी देऊन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे, या हत्येप्रकरणात सामील असलेल्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात या आधी डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर डॉ. सुवर्णा वाजे या गाडीसह जळालेल्या अवस्थेत मिळाल्या होत्या. मात्र तो मृतदेह सुवर्णा वाजे यांचाच होता की दुसऱ्या कोणाचा ही माहिती मिळत नव्हती. आता डीएनए तपासातून ती माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नाशिक पोलिसांच्या तपासानुसार, डीएनए एकच असल्याने आता डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. वाजे यांच्या हाडाचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन जाळण्यात आल्याचा अंदाज होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अखेर हे प्रकरण उकरुन काढलं आहे.

हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here