असदुद्दीन ओवेसींच्या ताफ्यावर गोळीबार

अहमदनगर,दि.३ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. आज मेरठच्या किथौध भागातून दिल्लीला जात असताना दोन लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडल्या. फायरींगमध्ये गाडीचं टायर पंक्चर झाल्याची माहिती आहे. सुदैवाने ओवैसी यांना कोणतीही इजा झालेली नाही. विधानस निवडणुकीनिमित्ताने ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये होते. आज प्रचारानंतर ते मेरठवरुन दिल्लीला परतत असताना त्यांच्या ताफ्यावर अचानक दोन लोकांना गोळीबार केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले.

एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले, “मी किथौध, मेरठ येथील एका मतदान कार्यक्रमानंतर दिल्लीला निघालो होतो. छाजरसी टोल प्लाझाजवळ दोन लोकांनी माझ्या वाहनावर सुमारे तीन ते चार गोळ्या झाडल्या. ते एकूण ३-४ लोक होते. माझ्या वाहनाचे टायर पंक्चर झाले, त्यानंतर मी तेथून दुसऱ्या वाहनाने निघालो,” असं त्यांनी सांगितलं.दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here