राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या नगर शहराध्यक्षपदी श्रेणीक शिंगवी यांची निवड

अहमदनगर,दि.८ मार्च,(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि ३५ वर्षांपासून अहमदनगरच्या नाट्य-सांस्कृतिक-चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले श्रेणीक शिंगवी यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.मा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते आणि आ.अरुण काका जगताप,आ.संग्राम जगताप, जि.प.सदस्य सचिन जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजान
अभिनेते तंत्रज्ञ अनंत रिसे आदी उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छा देताना खा.सौ.सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे राबवित असताना राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक, सांस्कृतिक जबाबदारी स्वीकारून कला, कलाकार यांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन, समाज जागृती व्हावी यातून विविध प्रश्न मांडले जावेत आणि यावर प्रभावी उपाय योजना व्हावी हीच सांस्कृतिक विभागाची मोठी जबाबदारी आहे.
श्रेणीक शिंगवी यांचे अहमदनगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात मौलिक आणि महत्वपूर्ण योगदान असून, दिग्दर्शन, अभिनय क्षेत्रात त्यांना अनेक पारितोषिके असून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग आयोजित नाट्य स्पर्धेत अभिनयाचे प्राथमिक आणि अंतिम फेरीत रौप्यपदक विजेते आहेत. झी मराठी, ईटीव्ही मराठी, दूरदर्शन वरील अनेक मालिकेत, वेबसिरीजआणि चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला आहे. त्यांच्या या चौफेर कामगिरी मुळे त्यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असे आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप यांनी सांगितले.

अहमदनगरच्या नाट्य व सांस्कृतिक कलाकारांना जगताप परिवाराने नेहमीच मोलाचे सहकार्य केले असून अनेक कलाकार घडविले आहेत, म्हणूननच राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या शहर अध्यक्ष पदावरून कार्य करताना आ.अरुण काका जगताप, आ.संग्राम भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हौशी, व्यावसायिक कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साठी स्पर्धात्मक कार्यक्रम, वयोवृद्ध कलाकारांसाठी मानधन योजना, शहरातील कलाकारांसाठी हक्काचे नाट्यगृह व्हावे यासाठी आग्रही भूमिका तसेच मालिका, लघुपट, चित्रपट चित्रीकरण अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावे आणि त्यातून कलाकारांना संधी मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी प्रयन करणार असे श्रेणीक शिंगवी यांनी सांगितले.
यावेळी स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,
नगरसेवक विनीत पाउलबुधे, विपुल शेटीया, बाळासाहेब पवार, निखिल वारे, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, सुमतीलाल कोठारी, नितीन लिगडे उपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here