राखी सावंतच्या आईच्या उपचारासाठी सलमान केले असे काही

अहमदनगर,(नगर संचार ऑनलाईन टीम) – ‘बिग बॉस’ फेम राखी सावंतची आई सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. ती कॅन्सर या आजाराने पीडित आहे. तिच्यावर आज एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली. राखीने आपल्या आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सलमान खानचे आभार मानताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी तिच्या आईला काळजी न करण्याबाबत सांगत आहे तसंच तिला कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलायलाही सांगत आहे. तिची आई जया सावंत हिने सलमान खानचे आभार मानले तर तो देवदूत असल्याचंही ती सांगत आहे. ती हेही म्हणाली की सलमानचा संपूर्ण परिवार या उपचारादरम्यान तिच्या पाठीशी उभे असल्याचंही सांगितलं.

या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, “मी सलमानजींना नमस्कार करते. आमच्या जीजसकडे आम्ही प्रार्थना करत होतो की आता आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही आता काय करणार, मी अशीच मरेन का…पण माझ्या देवाने, जीजसने सलमान खानला देवदूत म्हणून आमच्याकडे पाठवले आणि माझ्यासाठी आज सलमान खान उभे राहिले, माझं ऑपरेशन त्यांच्यामुळे होऊ शकतंय. त्यांचा पूर्ण परिवार माझ्यासाठी उभा राहिला आहे. मी परमेश्वराचे आभार मानते, सलमान यांचे आभार मानते. “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here