कर्जतच्या सोनाली मंडलिकला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

कर्जत,दि.३१ मार्च,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयाची खेळाडू कु सोनाली कोंडिबा मंडलिक हिने ५७ किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्ती करीत पटना (बिहार) येथे ३० मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. सोनालीच्या या रौप्य पदक कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहित पवार, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर बप्पासाहेब धांडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर, उपप्राचार्य प्रा भास्कर मोरे, डॉ महेंद्र पाटील, प्रा भागवत यादव, डॉ संदीप आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोनालीस जिमखाना विभाग प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक डॉ  संतोष भुजबळ, किरण मोरे, प्रा शिवाजी धांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here