कोरोनाचा कहर रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केले हे कडक निर्बंध

अहमदनगर,दि.८ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील वाढती कोरोना संसर्गाची स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. उद्या मध्य रात्रीपासून राज्यात कडक निर्बंध रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचार बंदी. नाईट कर्फ्यू घोषीत. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा ५ पैक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार. ५०% नाट्यगृह, सीनेमागृह राज्यातील हाँटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार. राज्यातील शाळा, महाविद्यालय १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. सरकारी कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील. संचारबंदी आणि जमावबंदीचे नियम लागू राहतील. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here