स्पर्धेत भाग घेतल्यानेच विद्यार्थ्यांची होईल प्रगती – देवदान कळकुंबे

सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या ऑनलाईन स्पर्धेस एलकेजी व युकेजी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

अहमदनगर,दि.१० ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – लहान मुलं निरागस असतात. करोना काळात सर्वात जास्त नुकसान लहान मुलाचं झालं आहे. ऑनलाइन शिक्षणा देण्यासाठी शिक्षकांनी सर्वात जास्त मेहनत घेतली आहे. सेंट विवेकानंद स्कूलने शिक्षणाची चांगली सेवा करत आपला स्टँडर्ड जपला आहे. करोनानंतर लहान विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थांना चांगले प्रोत्साहन दिले आहे. स्पर्धेत भाग घेतल्यानेच प्रगती होत असते. त्यामुळे लहानपणापासून स्पर्धेत भाग घ्यावा, असे प्रतिपादन बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक देवदान कळकुंबे यांनी केले.

सिंधी एज्युकेशनच्या सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने शहरातील एलकेजी व युकेजी मधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या आंतरशालेय ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थांना पारितोषिक वितरण समारंभात देवदान कळकुंबे बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव दामोदर बठेजा, प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी आदींसह शाळेतील शिक्षकवृंद, सहभागी विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

दामोदर बठेजा म्हणाले की, करोनाचे आलेल्या संकटाच्या सुरवाती पासून बूथ हॉस्पिटलने केलेली सेवा कधीही विसरू शकणार नाही. अभिमानास्पदच काम बूथ हॉस्पिटलने केले आहे. छोट्या छोट्या विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेवून आपले टॅलेंट सिद्ध केले आहे. प्राचार्या गीता म्हणाल्या, विवेकानंद स्कूलने करोना मुळे प्रथमच ही स्पर्धा ऑनलाईन घेतली. शहरातील शाळांनी या स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी म्हणाल्या, सहभागी झालेल्या चीमुल्यांनी खूप छान सादरीकरण केले आहे. त्यामुळे स्पर्धा अतितटीची झाली आहे.
प्रास्ताविकात उपप्राचार्या कांचन पापडेचा यांनी विवेकानंद स्कूलच्या उपक्रमंची माहिती देत स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश विषद करत सर्वांचे स्वागत केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, एलकेजी गट– प्रथम विराज सिंग तक्षशीला स्कूल, द्वितीय आरवी रमणी फिल्डगील्न्स स्कूल, तृतीय स्पंदन राळेभात विवेकानंद स्कूल, उत्तेजनार्थ इलीषा आरंह फिल्डगील्न्स स्कूल, नुरीन शेख आठरे पाटील पब्लिक स्कूल व ओमेश बोल्ली ऑझ्जेलियम स्कूल.

युकेजी गट– प्रथम अन्वी गांधी फिल्डगील्न्स स्कूल, द्वितीय अदिर भुजबळ तक्षशीला स्कूल, तृतीय आध्या देशमुख ऑझ्जेलियम स्कूल, उत्तेजनार्थ अयात शेख सेंट विवेकानंद स्कूल, आरव्ह खूपचंदाणी विवेकानंद स्कूल, ज्युली लोखंडे सेक्रेड हार्ट कॉनव्हेंट स्कूल व दिव्हिक कुमार फिल्डगील्न्स स्कूल. सर्व विजेत्या विद्यार्थांना प्रमाणपत्र, मोमेंटो व बक्षिस देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here