रुईछत्तिशी ता.नगर येथे अचानक डांबराच्या टॅकरने घेतला पेट

रुई ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे धोका टळला

नगर,दि.२१ मे, (शिवा म्हस्के) – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथे रुई-वडगाव रस्त्यावर जात असलेल्या एका डांबराच्या टँकरने अचानक पेट घेतला. मागील बाजुने टँकरने पेट घेतल्याने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. शेजारील कानिफनाथ फर्निचर मॉल या भव्य दालनाच्या मालकीचा बोअरवेल असल्याने मालक श्री.संतोष गोरे आणि उपस्थित जनसमुदाय यांच्या मदतीने आग विझविण्यास मदत झाली. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे कोणतेही विशेष नुकसान झाले नाही असे चालकाकडून सांगण्यात आले.

यावेळी आग विझविण्यासाठी श्री.संतोष गोरे यांनी बोअर चालू करुन सहकार्य केल्याने हे सर्व शक्य झाले असा अभिप्रायही देण्यात आला.
रुईछत्तिशी गावातील सर्व ग्रामस्थ आलेल्या कोणत्याही संकटाला धिरोदात्तपणे तोंड देतात. सहकार्याची भुमिका ठेवतात. पेट घेतलेला टँकर नगर-सोलापुर रोड वर नसल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली नाही. कोरोनाचा काळ असल्याने लोकांनीही गर्दी करण्याचे टाळले असे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here