पाथर्डी,दि.३ एप्रिल,(प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील मोहोजबुदूक येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुरेश शिरसाठ यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत शिरसाट यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहूजन आघाडीमध्ये पक्षाचे राष्ट्रियनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी शिरसाट यांना निवडीचे पत्र देत त्यांचा सत्कार केला.
वंचित बहूजन आघाड़ीचे काम जो स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्ता तन मन धनाणे करतो अन्याय अत्याचार विरोधात लढतो त्याचा मानसन्मान वंचित बहूजन आघाड़ीमध्ये होतो. तुम्हाला मिळालेले अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष हे पद फार महत्वाचे आहे आपण सर्व समाजातील सर्वसामान्य कुटुंबां करीता कार्य करावे अशी भावना प्रा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका उपाध्यक्ष दिगंबर बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव आदी उपस्थित होते.