बहुप्रतिक्षित ‘केजीएफ – २’ या दिवशी होणार रिलीज

अहमदनगर,दि.१० जानेवारी,(प्रतिनिधी) – दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर १.’ तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरीअंटमुळे कोरोनाच्या संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असून कोरोना पेशंटची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचे म्हटले जात होते. पण प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘केजीएफ – २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली आहे. ‘केजीएफ -२’ हा चित्रपट ठरलेल्या दिवशी १४ एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली नाही. यशच्या वाढदिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे. त्यामुळे केजीएफ चाहत्यांना अभिनेता यश च्या वाढदिवसाच्या निमित्ताने केजीएफ थिएटरमध्ये पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here