मराठी बिग बॉसच्या घरात वाहतात सध्या प्रेमाचे वारे

अहमदनगर,दि.१३ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस या रिऍलिटी शोचे सध्या तिसरे पर्व सुरु आहे. बिग बॉस हा शो प्रेक्षकांमध्ये कायम लोकप्रिय होत असतो. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये ज्या पद्धतीने वादविवाद रंगतात. तशाच पद्धतीने काही स्पर्धकांचे प्रेम प्रकरणही चर्चेत येतात. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे दोन पर्व पार पडले असून या दोन्ही पर्वामध्ये काही स्पर्धकांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर आता तिसऱ्या पर्वातही अशाच दोन जोड्या त्यांच्यातील जवळीक वाढल्यामुळे चर्चेत येत आहेत. कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्नेहा वाघ आणि जय दुधाणे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर जय अप्रत्यक्षपणे त्याच्या प्रेमाची कबुली देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी सोनाली आणि विशाल यांच्यातील मैत्री चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, आता त्यांच्यानंतर आणखी एक जोडी चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्यातील जवळीक प्रेक्षकांच्याही नजरेत आली असून सध्या या दोघांमध्ये मैत्रीपलिकडे नातं निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. ‘वक्त नहीं बदलता, मगर दिल बदलते हैं.. ‘असं म्हणत जय त्याच्या भावना स्नेहाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे स्नेहालादेखील जयच्या भावना समजत असून ती केवळ स्मित हास्य करताना दिसत आहे. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर यांनी घरात प्रेमाचे वारे वाहत असल्याचे सांगितले होते. यावर बऱ्याचशा स्पर्धकांनी याला दुजोरा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here