जानेवारीत ओटीटीवर रिलीज होणार या जबरदस्त वेबसिरीज

अहमदनगर,दि.११ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – कोरोना प्रादुर्भावामुळे चित्रपट प्रदर्शनावर अनेक बंधन आले आहेत. त्यामुळे अनेक हिंदी मराठी चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपट कलाकारांनी ओटीटीचा आधार घेतल्याचं पहायला मिळतय. अनेक दिग्गज लेखक दिग्दर्शक आणि कलाकार आता वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २०२२ मध्ये नक्की कोणत्या वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ते पाहूया.

कोरोना वाढत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लोकांसाठी थिएटरचा पर्याय बंद झाला असून लोकांना घरातच राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत लोक पुन्हा त्यांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत. या जानेवारीत लोकांना मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. जानेवारी महिन्यात कोणते सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत याची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

मार्व्हल्स इटर्नल (डिस्नी प्लस)

मार्वल स्टुडिओ पुन्हा एकदा तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा ११ जानेवारीला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अँजेलिना जोली, कुमेल नानजियानी, गेम्मा चॅन, रिचर्ड मॅडेन, लॉरेन रिडलॉफ, सलमा हेक आणि ब्रायन टायरी हेन्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

येह काली काली आंखे (नेटफ्लिक्स)

श्वेता त्रिपाठी आणि ताहिर भसीन स्टारर थ्रिलर वेबसीरिज ये काली काली आखें या महिन्याच्या १४ तारखेला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजची कथा प्रेम आणि उत्कटतेने भरलेली असणार आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी आधीच पसंती दिली आहे.

कौन बनेगी शिखरवती (झी फाईव्ह)

ही वेबसीरिज झी ५ वर ७ जानेवारीला रिलीज झाली आहे. ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह, सोहा अली खान, लारा दत्ता, कृतिका कामरा आणि रघुबीर यादव यांसारखे अनेक मोठे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. नसुरुद्दीन शाह यांचा दमदार अभिनय बऱ्याच दिवसानंतर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

पुष्पा (अमेझॉन प्राईम)

बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुन अभिनित पुष्पा हा दाक्षिणात्य चित्रपट अमेझॉन प्राईम वर ७ जानेवारी रोजी तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. हिंदी भाषेत हा चित्रपट दिनांक १४ जानेवारीला अमेझॉन प्राईम वर पाहायला मिळणार आहे.

ह्यूमन (डिस्ने प्लस)

ड्रग ट्रायल्सवर आधारित ‘ह्यूमन’ ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर १४ जानेवारी रोजी प्रसारित केली जाईल, ज्याची कथा गरीब लोकांवर बेकायदेशीर ड्रग चाचण्यांवर आहे. या वेबसीरिजमध्ये शेफाली शाह, विशाल जेठा, कीर्ती कुल्हारी, सीमा बिस्वास, राम कपूर आणि आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कॅम्पस डायरीज (एम एक्स प्लेअर)

तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेजच्या दिवसांत जायचे असेल तर ही वेबसीरिज तुमच्यासाठी योग्य आहे. ही मालिका तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेज कॅम्पसमध्ये घेऊन जाईल. MX Player ची ही वेबसीरिज ७ जानेवारीला रिलीज झाली आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here