आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.१२ मार्च २०२२)

जाणून घ्या आज शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ रोजीचे पंचांग, दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – शनिवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय दुपारी १.३०, चंद्रास्त पहाटे ३.१५, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ६.४२, भारतीय सौर फाल्गुन २१ शके १९४३.

मेष : शांतचित्ताने निर्णय घ्यावा. सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.

वृषभ : हितचितकांचा सल्ला महत्वाचा ठरेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्साही राहील.

मिथुन : सरकारी नोकरीतील व्यक्तींना चांगला दिवस राहील. एखादी मोठी समस्या सुटू शकते.

कर्क : एखाद्या समस्येचे निवारण होण्याची शक्यता आहे. प्रगतीचे मार्ग खुले होतील.

सिंह : कुणासोबत विनाकारण वाद घालू नका. हितशत्रूंना नामोहरम करा.

कन्या : मानसिक शांतता लाभेल. गुंतवणूकीचे निर्णय लांबणीवर टाकणे योग्य राहील.

तुळ : मध्यम फलदायी दिवस राहील. जमा व खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.

वृश्चिक : धैर्यासह संयमाने परिस्थिती हातळतांना कस लागेल. घाईत कुठलाही निर्णय घेणे योग्य राहणार नाही.

धनु : नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. खरेदीचे योग येतील.

मकर : आवश्यक कामे आज पुर्ण करावी. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल.

कुंभ : धार्मिक ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.

मीन : नियोजीत कामात बदल करु नका. हाती घेतलेली कामे पुर्ण करा.

दिनविशेष -१९९३ – मुंबईतील शेअर बाजार, एअर इंडिया, सेंच्युरी बझार आदी १५ ठिकाणी अवघ्या दीड तासांत भीषण बाँबस्फोट होऊन दोनशेहून अधिक लोक ठार. ११०० जखमी.१९९९ – चलनी नोटांवर यापुढे फक्त महात्मा गांधी यांचेच चित्र असेल, असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.२००१ – राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान.२००३ – मधुमेहामुळे निर्माण होणारे विविध आजार आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या आजारावरील एक संयुक्त उपचारपद्धती निर्माण केल्याबद्दल भारतीय डॉक्‍टर ज्योती घोष यांना अमेरिकेचा पाच लाख डॉलरचा (२.४ कोटी रुपये) पुरस्कार जाहीर.२०११ – संपूर्ण स्वदेशी बनावटीचा अर्जुन रणगाडा लष्कराच्या ७५व्या आर्म्ड रेजिमेंटमध्ये समाविष्ट.


हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here