आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.१५ मार्च २०२२)

जाणून घ्या आज मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२ रोजीचे पंचांग, दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – शनिवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ५.४८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, शनिप्रदोष, संक्रांत करिदिन, भारतीय सौर पौष २५ शके १९४३.

मेष : एखादी चांगली बातमी समजेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृषभ : पारिवारिक वातावरण उत्साही असेल. गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीचा योग.

मिथुन : बोलण्यातील मधुरता प्रतिष्ठा मिळवून देईल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.

कर्क : व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला दिवस. चांगले विचार मनात घर करतील.

सिंह : प्रवासाचे योग जुळून येतील. धन, सत्ता व प्रतिष्ठा वाढेल. नव्या ओळखी लाभदायक होतील.

कन्या : व्यवसायासाच्या नविन संधी प्राप्त होतील. व्यावसायीक गुंतवणूकीसाठी चांगला दिवस राहील.

तुळ : नातेसंबंध दृढ होतील. व्यावसायीक प्रश्न मार्गी लागतील.

वृश्चिक : नवीन कामाला सुरुवात करण्यापुर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. खर्चाचा अंदाज घेवून कामे करावी.

धनु : कामानिमित्त प्रवास घडेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मकर : मान, सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून योग्य ते सहकार्य मिळून प्रश्न सुटेल. 

कुंभ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग प्रशस्त होतील. दिवस चांगला जाईल.

मीन : अनावश्यक खर्च टाळावे. संयमाने प्रश्न हाताळल्यास फायद्याचे ठरेल.

दिनविशेष – १९९६ – भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरविणाऱ्या मुंबईतील बोरीबंदर (व्हिक्‍टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले. १९९९ – ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान. २००६ – सौरमालेच्या जन्माचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने अंतराळात पाठविण्यात आलेली अवकाश कुपी २.९ अब्ज किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेच्या हवाई दलाच्या उटाह तळावर सुखरूप उतरली. २०१८ – सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ‘ओपनिंग फिल्म’चा मान बोस्नियाच्या ‘मेन डोण्ट क्राय’ या चित्रपटाला मिळाला.


हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here