आजचे दिनविशेष व राशिभविष्य (दि.२० मार्च २०२२)

जाणून घ्या आज रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजीचे पंचांग दिनविशेष व आपले राशिभविष्य

पंचांग – भारतीय सौर २९ फाल्गुन, शक संवत १९४३, फाल्गुन कृष्ण द्वितीया, रविवार, विक्रम संवत २०७८. सौर फाल्गुन मास प्रविष्टे ०७, शब्बान १५, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २० मार्च २०२२ ई. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतू. सूर्योदय: सकाळी ६-४४, सूर्यास्त: सायं. ६-४८,

मेष : ग्रहांची स्थिती उत्तम लाभदायक ठरण्याची शक्यता. धनवृद्धीचे योग देखील जुळण्याची शक्यता.

वृषभ : बोलण्यातील आक्रमतेला आवर आवश्यक आहे. प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता.

मिथुन : अध्यात्मिक आवड निर्माण होईल. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाल्याचे समाधान लाभेल.

कर्क : सदाचरण आणि उत्तम वर्तनाने आपण सर्वांना जवळ कराल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

सिंह : हाती घेतलेल्या कामात सफलता येईल. आनंदाची अनुभुती घ्याल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

कन्या : जेष्ठांच्या आशिर्वादाने हाती घेतलेली कामे पुर्ण होतील. मौल्यवान वस्तूच्या खरेदीचा योग येवू शकतो.

तुळ : अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालणे आवश्यक. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

वृश्चिक : अचानक खर्चात वाढ होवू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होईल.

धनु : व्यवसायाचा विस्तार होईल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस.  उत्साही वातावरण राहील.

मकर : नवीन आर्थिक स्रोत उपलब्ध होतील. शैक्षणीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम दिवस.

कुंभ : कौटुंबिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे लाभेल. राग आणि वाणीवर ताबा आवश्यक आहे.

मीन : एखाद्या गृहोपयोगी वस्तूची खरेदी शक्य. न्यायालयीन प्रकरणात एखादी चांगली वार्ता मिळू शकते.


दिनविशेष

१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.

१९१७: महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

१९५६: ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

२०१५: सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.


Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here